शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

ठाकरे सरकारकडून प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा, छाबय्या विहंग गार्डन इमारतीवर लावलेला दंड आणि व्याज माफ, मंत्रिमंडळाचा निर्णय़

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 8:08 PM

Maharashtra Government Cabinet decisions : Pratap Saranaik यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या इमारतीवर लावण्यात आलेला दंड आणि त्या दंडावरील व्याज माफ करण्याचा तसेच इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या इमारतीवर लावण्यात आलेला दंड आणि त्या दंडावरील व्याज माफ करण्याचा तसेच इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. छाबय्या विहंग गार्डन ही इमारत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आली होती.

आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाने प्रताप सरनाईक यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान,  राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये मराठी पाट्या अनिवार्य करणे, छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता देणे, कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देणे यासह एकूण दहा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय 

- छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता(नगर विकास विभाग)- पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता (महसूल विभाग )- गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा. (महसूल विभाग )- मौजे आंबिवली येथील जमीन  "शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला "मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरी" साठी  भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता. (महसूल विभाग )- महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान ३% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करून देणार. (महिला व बाल विकास विभाग )-  कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देण्याचा निर्णय. ( परिवहन विभाग )-  दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक ( कामगार विभाग )- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई महामंडळाकडून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली यांची थकित वसुली ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता. (सामाजिक न्याय विभाग) -  बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ९ अध्यापकीय पदांची निर्मिती. (वैद्यकीय शिक्षण विभाग)-  बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या "निवासी" हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत. (नगर विकास विभाग)

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेना