शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळागौरीच्या खेळांसाठी मोठी मागणी

By admin | Updated: August 2, 2016 01:16 IST

श्रावण महिना आला, की होणारा ऊनपावसाचा खेळ... सणासुदीने सजलेले दिवस... आणि आधुनिक पद्धतीने या सणांचा आनंद लुटणाऱ्या शहरातील महिला...

पुणे : श्रावण महिना आला, की होणारा ऊनपावसाचा खेळ... सणासुदीने सजलेले दिवस... आणि आधुनिक पद्धतीने या सणांचा आनंद लुटणाऱ्या शहरातील महिला... मंगळागौर हा श्रावणात साजरा केला जाणारा असाच एक सण. पूर्वीच्या काळी माहेरी जाण्याचे आणि महिलांना एकत्रित येण्याचे साधन म्हणून साजरा केला जाणारा हा सण आता काळ बदलल्याने आधुनिक पद्धतीने साजरा केला जात आहे. इतकेच नाही तर खेळांमधून मनोरंजनाबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीही केली जात आहे. पूर्वी नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या मैत्रिणी आणि बहिणी रात्रीचे जागरण करून मंगळागौरीचे खेळ खेळत असत. इतकेच नाही तर या महिला खेळांमध्ये अक्षरश: दंग होऊन जात. मात्र, आता हे पारंपरिक खेळ खेळण्यासाठी महिलांच्या गटाला मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. मध्यमवयीन महिलांचे अनेक गट या खेळांच्या सरावामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)>कोंबडा, गोफ खेळांमुळे सर्वांगाला व्यायामही नोकरी आणि सणवार हे संभाळताना शहरातील मुलींची तारेवरची कसरत होते. घरातील जबाबदाऱ्या, नोकरीचा ताण हे सर्व सांभाळताना मुलींची ओढाताण होते. तसेच, आताच्या पिढीला हे सर्व पारंपरिक खेळ माहीत असतीलच, असे नाही. त्यामुळे खेळ तर खेळायचेत; मात्र त्याची फारशी माहिती नाही अशांकडून मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या गटांना मोठी मागणी असल्याचे दिसते. यात खेळल्या जाणाऱ्या फुगड्या, झिम्मा, पिंगा यांचे विविध प्रकार तसेच काचकिरडा, खुर्ची का मिर्ची, कोंबडा, गोफ यासारख्या खेळांमुळे सर्वांगाला व्यायामही होतो. याबाबत महालक्ष्मी ग्रुपच्या अध्यक्षा अपर्णा बवरे म्हणाल्या, ‘‘आमचा १० जणींचा ग्रुप असून सगळ्या महिला ५० वर्षांहून अधिक वयाच्या आहेत. आम्हाला एका मंगळवारी तीन ते पाच ठिकाणांहून खेळण्यासाठी बोलावण्यात येते. यातील अनेक पारंपरिक खेळ सध्या माहीत नसल्याने तसेच आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने ही बोलावणी येतात. एका दिवशी जास्त ठिकाणी जायचे असल्याने आम्ही गाडी करून सर्व ठिकाणी जातो.’’ तर, पुढील पिढ्यांपर्यंत हे खेळ पोहोचविण्यास या माध्यमातून मदत होत असल्याचे मंगल ग्रुपच्या सुनीता जोशी यांनी सांगितले. हौैस म्हणून आम्ही हे खेळ खेळण्यास सुरुवात केली होती; मात्र आम्हाला अनेकांकडून खेळासाठी विचारणा करण्यात आली आणि आता तर ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही त्या म्हणाल्या. हे खेळ खेळत मंगळागौरीची रात्र जागविण्याची पद्धत आहे. मात्र, सध्या शहरातील महिलांच्या सोयीनुसार रात्रीचे खेळ कधी सकाळी, तर कधी दुपारी खेळले जातात. त्यामुळे आधुनिकतेची कास धरून रूढी-परंपरा जपण्यासाठी महिलांच्या ग्रुपला मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी बोलावण्याची अनोखी पद्धत सध्या शहरांमध्ये चांगलीच रूढ होत असल्याचे चित्र आहे.