शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

समोर आला महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला, भाजप 22 खाती ठेवणार; शिंदे आणि दादांना काय मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:27 IST

सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे 21 ते 22 खाती असू शकतील, असे वृत्त आहे...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. जनता जनार्धनाने महायुतीच्या पारड्यात अतिप्रचंड बहुमत टाकले आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. यातच, पाच डिसेंबरला शपथविधीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. दरम्यान, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे 21 ते 22 खाती असू शकतील, असे वृत्त आहे.

महाराष्ट्र सरकारमधील जागावाटपासंदर्भात आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 21 ते 22 खाती असू शकतात. यांत गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चरर्चा होणार असल्याचे समजते. 

याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 11 ते 12 मंत्री असतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये 16 खाती मागितली आहेत. संबंधित वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेतील. हा शपथविधी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.

कुणाला कोणतं खातं मिळू शकतं? -संबंधित वृत्तानुसार, भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषदाध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, 16 डिसेंबरपासून नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे  तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार