शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना ताडपत्र्या मिळणार

By admin | Updated: June 28, 2014 23:42 IST

एक कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता : अन्न व पुरवठा विभागाचा निर्णय

वाशिम : राज्यातील शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या धान्याचे नुकसान टाळण्यासाठी प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या देण्यात येणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यासाठी एक कोटी रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.पावसापासून आणि तीव्र उन्हापासून धान्याचे संरक्षण न केल्यामुळे, शासकीय गोदामातील धान्याचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. धान्य सडून, जनावरांसाठीही खाण्यायोग्य न राहिल्यामुळे ते नष्ट करावे लागते. धान्याचे हे नुकसान टाळण्यासाठी शासकीय गोदामांना आयएसआय दर्जाच्या प्लास्टिकच्या ताडपत्र्या पुरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमधील शासकीय गोदामांना आवश्यक असलेल्या प्लास्टिक ताडपत्र्यांबाबतची माहिती पुरवठा आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्ह्यांकडून मागविली होती. आयुक्त कार्यालयाने ३१६१ प्लास्टिक ताडपत्र्यांचे मागणीपत्र शासनास यापूर्वीच सादर केले होते. त्यानुसार उद्योग संचालनालयाने मुंबई येथील मे. रेनप्रुफ एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी ताडपत्र्या खरेदीचा दरकरार केला होता. त्या कराराची मुदत ३0 जून २0१४ पर्यंत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येकी ३६ चौरस मीटर आकाराच्या ३१६१ ताडपत्र्या प्रत्येकी ३४४५ रुपये या दराने खरेदी करण्यासाठी १ कोटी ८ लाख ९0 हजार २७३ रुपयांचा निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही खरेदी होऊन सर्व शासकीय गोदामांना ताडपत्र्यांचा पुरवठा लवकरच होणार आहे.