शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक!

By admin | Updated: February 5, 2015 02:21 IST

पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’ची छापमुंबई : पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. तथापि, पत्रकार सुरक्षा कायद्याच्या तरतुदींविषयी सरकारमध्ये दुमत असल्याचेही त्यांनी सांगितले.शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात लोकमतच्या विविध आवृत्त्यांमधील १२ पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे या समारंभावर लोकमतची छाप होती. ई-माध्यमांनी सरकारपुढे अनेक प्रश्न उभे केले आहेत. त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ही माध्यमेदेखील मुख्य प्रवाहात कशी येतील व त्यावर नियंत्रण कसे येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. माध्यमांनी लोकशाहीवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. माध्यमांचे महत्त्व आपल्याला नक्कीच आहे; मात्र त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले. सामाजिक मूल्यांची जपणूक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पत्रकारिता करताना नैतिक बळ प्राप्त होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि हे आत्मचिंतन आम्ही आमच्यापासून सुरू करणेही गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.या वेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, लोकमतचे माजी मुख्य संपादक विजय कुवळेकर आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. शाल, श्रीफळ आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तीन वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले आहेत, याचा अर्थ शासन गतिमान होत आहे, असा निघू शकतो, असे खुमासदार शैलीत सांगत दिनकर रायकर म्हणाले, पत्रकारांनी आपण ज्या राज्यात राहतो, त्या भागाचे हित लक्षात घेऊन बातमीदारी केली पाहिजे. जीवनगौरव पुरस्कार हा उर्वरित आयुष्यात काही तरी गौरवपर करण्यासाठी दिला आहे, असे मानत असल्याचे विजय कुवळेकर म्हणाले.तत्पूर्वी माहिती खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तर महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी मनीषा म्हैसकर यांचे आणि संचालक शिवाजी मानकर यांनी चंद्रशेखर ओक यांचे स्वागत केले. मानकर यांनी आभार मानले.मुख्यमंत्र्यांनी काढला चिमटासरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असे आपण काही महिन्यांपूर्वी सतत बोलत होतो. पण मागच्या सरकारने वेळीच निर्णय घेतले असते तर आज आपल्याला तीन वर्षांच्या ४५ विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले नसते, असा जोरदार चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.पुरस्कार विजेते लोकमत समाचार; जळगावचे मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार, लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म. परांजपे पुरस्कार, लोकमत अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील यांना परुळेकर पुरस्कार.