शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर

By admin | Updated: November 1, 2015 00:53 IST

भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या

- नामदेव मोरे , नवी मुंबई
भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या महाराष्ट्र व अखिल भारतीय संघटनेने केला आहे. या संघटनेने वर्षभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट मिळावी, यासाठी सात पत्रे दिली आहेत, परंतु पूर्ण वर्षात मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी वेळच मिळू शकलेला नाही. वर्षपूर्तीच्या काळात सरकारला राज्यातील १ कोटी ११ लाख ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला असल्याचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन, राज्यातील ज्येष्ठांच्या समस्या ऐकल्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही ज्येष्ठ नागरिक धोरणाचा समावेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांना पत्र पाठवून राज्यातील ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करण्यात यावी व इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली, परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. वारंवार भेट मिळावी, यासाठी पाठपुरावा केला, पण या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही.
केंद्रामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना वृद्धाश्रम उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु अद्याप एकही वृद्धाश्रम उभा राहिला नाही. राज्य सरकारही वृद्धाश्रमांसाठी ठोस कार्यवाही करत नाही. त्यामुळे हे ‘अच्छे दिन’ आमच्यासाठी नव्हेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.