शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार कोटींचा सरकारी नाकर्तेपणा!

By admin | Updated: May 29, 2014 03:15 IST

जलसिंचन घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेने राज्यभर रान पेटवले. श्वेतपत्रिका आल्यापासून आजतागायत प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता द्यायची कोणी, याचा निर्णय घेण्यास मंत्री-सचिव समिती आणि मंत्रिमंडळ तयार नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई - जलसिंचन घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेने राज्यभर रान पेटवले. श्वेतपत्रिका आल्यापासून आजतागायत प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता द्यायची कोणी, याचा निर्णय घेण्यास मंत्री-सचिव समिती आणि मंत्रिमंडळ तयार नाही. या नाकर्तेपणामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात ५५०० कोटी रुपये खर्चाविना पडून आहेत, तर दुसरीकडे प्रकल्पांच्या किमती १४ हजार कोटींनी वाढल्या आहेत. सरकारचा हा नाकर्तेपणा राज्याला मात्र मोठ्या आर्थिक खड्ड्यात नेणारा ठरला आहे. श्वेतपत्रिका आली त्या वेळी राज्यात लहान-मोठे मिळून ६७० प्रकल्प प्रलंबित होते, ज्यासाठी ७८,४५१ कोटी रुपये लागणार होते. त्यातले २१८ प्रकल्प बाजूला केले गेले. आज शिल्लक ४५२ प्रकल्पांसाठी ७०,७५० कोटी रुपये लागणार आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत सगळी कामे ठप्प झाली आहेत. मूळ अंदाजात वर्षाला १० टक्के वाढ होते. यानुसार, ७० हजार कोटींवर १४ हजार कोटींचा फटका राज्यातल्या जनतेला बसणार आहे. सरकार मात्र यावर गप्पच आहे. विविध महामंडळे स्थापन झाल्यापासून २००४ पर्यंत अशा मान्यता देण्याचे अधिकार त्या-त्या महामंडळांना होते. २००४ नंतर हे अधिकार जलसंपदा विभागाचे सचिव आणि मंत्री यांना देण्यात आले. प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च झाल्यास व्यय अग्र समिती (एक्स्पेंडिचर प्रायोरिटी कमिटी) मान्यता देण्याचे काम करत असे. वित्तमंत्री, मुख्य सचिव, वित्त, नियोजन आणि जलसंपदाचे सचिव यांची ही समिती होती. श्वेतपत्रिकेच्या गदारोळानंतर या समितीने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा (पान ७ वर...)