शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची विक्री पंधरवड्यात ३० टक्क्यांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:17 IST

गेल्या पंधरवड्यातील चित्र : सण-उत्सव व लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग

जळगाव : नवरात्र व विजयादशमी यामुळे सुवर्णनगरी जळगावात दोन आठवड्यांमध्ये सोन्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक मंदी असतानाही दिवसेंदिवस सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. दसऱ्याला तर शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. सोमवारी येथे सोन्याचा भाव ३८,४०० रुपये तर चांदीचा ४६ हजार रुपये भाव होता. गेल्या पंधरवड्यात सोन्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या ठिकाणी एक किलो सोने विक्री होत असे तेथे आता ते सव्वा किलोच्यावर विक्री होत असल्याची माहिती मिळाली. दिवाळी आणि लग्नसराईदेखील जवळ येत असल्याने खरेदीची लगबग वाढली आहे.

चार वर्षांच्या तुलनेचा विचार केला तर आताची ही मागणी अद्यापही त्या प्रमाणात नसल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलेला नाही. दिवाळीमध्ये चांगल्या व्यवसायाची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.नवरात्र उत्सवापासून सोन्याची मागणी चांगली वाढली असून ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यात गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जात आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.