शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीची दगडी शाळा बनली गोदाम

By admin | Updated: March 11, 2015 02:11 IST

भिवंडीत स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झाल्यानंतर लोकवर्गणीतून बांधलेल्या १२० वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेतील कार्यालय महापालिकेच्या

भिवंडी : भिवंडीत स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झाल्यानंतर लोकवर्गणीतून बांधलेल्या १२० वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेतील कार्यालय महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात हलवावे आणि या ऐतिहासिक शाळेत पुन्हा वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे. याच इमारतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौथीपर्यंत शिकल्याचे भिवंडीकर सांगतात़महापालिकेच्या काही बांधकाम अधिकाऱ्यांनी मनपाच्या जुन्या ऐतिहासिक दगडी भिंतीच्या या शाळेची योग्यवेळी दुरूस्ती न करता जाणीवपूर्वक नवीन इमारत बांधण्याचे षडयंत्र रचले आहे. या शाळेमागे इमारतीत शिक्षण मंडळाचे कार्यालय होते. ती मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी तेथील वर्ग दुसऱ्या इमारतीत हलवून त्या ठिकाणी नव्याने शिक्षण मंडळाचे कार्यालय सुरू केले. नवीन इमारत बांधल्यानंतरही हे कार्यालय तिथे हलविण्यात आले नाही. शिक्षण मंडळाच्या सभापती व उपसभापतींची कार्यालये महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळाचे कार्यालयदेखील तेथे सुरू करणे अपेक्षीत आहे. सध्या तळमजल्यावर केवळ शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी व इतर स्टाफ बसतो. पहिल्या मजल्यावरील वर्गांना गोदाम बनवले आहे. शाळेतील वर्ग इतरत्र हलवल्याने पटसंख्यादेखील कमी झाली आहे. शिक्षण मंडळाने पहिल्या मजल्यावरील बंद वर्गांत तुटलेली बाके, पुस्तके आदि सामान ठेवून इमारतीचा गैरवापर केला आहे. येथील कार्यालय बंद करून दगडी शाळेत पुन्हा वर्ग सुरू करावेत, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. (प्रतिनीधी)