शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या सिंहस्थात गोदावरीचे शुद्धीकरण!

By admin | Updated: February 22, 2015 01:33 IST

पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने काही तरी चुका होणारच, परंतु अशा चुकांमधून मार्ग काढून चांगल्यात चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न सरकार करेल

नाशिक : विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने काही तरी चुका होणारच, परंतु अशा चुकांमधून मार्ग काढून चांगल्यात चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न सरकार करेल व आगामी बारा वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभ संपताच दुसऱ्या दिवसापासून केले जाईल, अशी घोषणा करून आत्तापासूनच नियोजन केल्यास आगामी कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन निश्चित घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. विद्यमान सरकारला कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे काही तक्रारी वा नाराजी असू शकते; परंतु अशाही परिस्थितीत नियोजनात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनासाठी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत साधू-महंतांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, यासाठी आपण स्वतंत्र कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)