शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलातील वनौषधी होणार ग्लोबल

By admin | Updated: September 9, 2014 04:59 IST

७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातील दुर्लक्षित वनौषधी आता ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे.

गडचिरोली : ७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातील दुर्लक्षित वनौषधी आता ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे. येथील जंगलात आढळणार्‍या वनोपजापासून गडचिरोली वनविभागाने ३२ प्रकारची औषधी वनस्पती तयार केली असून यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याबरोबरच औषधी वनस्पती व जंगलाचे संवर्धन देखील होणार आहे. गडचिरोलीच्या घनदाट जंगलात औषधी गुण असलेल्या हजारो वनस्पती व झाडे आहेत. या झाडांचा उपयोग येथील वैदू औषधी म्हणून करतात. मात्र एखाद्या रोगावर नेमक्या कोणत्या झाडाचे औषध देतात याची माहिती ते इतरांना सांगत नसल्याने याबद्दलचे ज्ञान र्मयादित राहत होते. वनविभागाने जिल्ह्यातील सुमारे २८0 वैदूंची सभा घेऊन कोणत्या रोगावर कोणत्या झाडाचा औषधी उपयोग केल्या जातो ही माहिती जाणून घेतली. त्यानंतर औषधी गुण असलेल्या बेहडा, पळसफूल, शरफुंखा, लाजाळू, ब्राrी, गुडवेल, सहचर, बीजा, बाहवा, खैरसाल, रक्तरोहणी, भुईनिंब आदी सुमारे १00 प्रकारच्या झाडांची आवश्यकतेनुसार पाने, साल, फुले, फळे, मुळे गोळा केली. यापासून चूर्ण तयार करून ते चूर्ण जिल्ह्यातील नोंदणीकृत वैदूंकडे उपलब्ध केले जाणार आहे. ही वनौषधी देशभरात पोहोचविण्याचा मानस गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णा बत्तुला यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे, वनोपज नागरिकांकडून एका विशिष्ट दराने खरेदी केले जाणार असल्याने यातून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होणार आहे. सद्यस्थितीत गडचिरोली येथेच वनौषधी तयार करण्याचा प्रकल्प स्थापन करण्यात आला असला तरी भविष्यात पाचही वनविभागात अशा प्रकारचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात टॅबलेट व सिरपही तयार करण्यात येणार आहे. वनौषधींची विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)