शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्ल्ड क्लास’ सुविधा द्या

By admin | Updated: February 5, 2015 01:16 IST

नागपूर रेल्वे स्थानकावर ‘वर्ल्ड क्लास’ सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, नागपूर येथून दिल्ली, मुंबई व उदयपूरसाठी नव्या गाड्या सुरू कराव्या याशिवाय रखडलेले प्रकल्प

रेल्वेच्या बैठकीत खासदारांची मागणी : स्वच्छतेवर लक्ष द्या!नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर ‘वर्ल्ड क्लास’ सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, नागपूर येथून दिल्ली, मुंबई व उदयपूरसाठी नव्या गाड्या सुरू कराव्या याशिवाय रखडलेले प्रकल्प त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी खासदारांनी लावून धरली. मध्य रेल्वेतर्फे नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांची बैठक बुधवारी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात झाली. तीत खासदारांनी उपराजधानीतील रेल्वे स्थानकावरील समस्या तसेच प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधांचा पाढाच वाचला. या बैठकीला खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती, खा. रामदास तडस, खा. प्रतापराव जाधव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह आदी उपस्थित होते. बैठकीत खा. विजय दर्डा म्हणाले, नागपूर रेल्वे स्थानकावर फ्लॅटफॉर्म क्रमांक १, २ व ५ वर रेल्वे रुळाच्या खाली काँक्रिटिंग उखडलेले आहे. त्यामुळे रुळाखाली साचणारी घाण निघून जात नाही. अस्वच्छता कायम राहते. त्यामुळे उखडलेले काँक्रिटिंग दुरुस्त करण्याची व अप्रॉन्सच्या गुणवत्तेत सुधार करण्याची मागणी खा. दर्डा यांनी केली. यावर सूद यांनी सांगितले की, भविष्यात रेल्वेत ग्रीन टॉयलेट लागणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून नवे अ‍ॅप्रान देणेच बंद करण्यात आले आहे. यावर दर्डा यांनी ग्रीन टॉयलेटची अंमलबजावणी होण्यास काही वर्षे लागली तर तोवर हीच परिस्थिती कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला. खा. अजय संचेती म्हणाले, नुकतीच नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘मेट्रोरिजन’ची बैठक झाली. तीत नागपूर परिसराचे पुढील ५० वर्षांचे नियोजन करण्यात आले. शहराचा वाढता पसारा, व्यापारात होणारी वाढ पाहता नागपूर परिसरातही बांद्रा व कुर्ला प्रमाणे दोन टर्मिनस विकसित करण्याची गरज आहे. या टर्मिनसचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा. त्यासाठी नियोजनात कुठलिही कमी पडू देऊ नका, अशी सूचनाही त्यांनी केली. एसी टू टायरच्या प्रत्येक कोेचमध्ये चार शौचालय असतात. यातील तीन भारतीय पद्धतीचे तर एक पाश्चिमात्य पद्धतीचे असते. यात बदल करून पाश्चिमात्य पद्धतीच्या शौचालयात वाढ करण्याची सूचना त्यांनी केली. पार्सल व्हॅनमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्राऊंड पोलीस व रेल्वे पोलिसांमध्ये समन्वय नसल्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनात समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने खासदारांची मदत घेतली तर राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले रेल्वेशी संबंधित प्रश्न निकाली काढले जाऊ शकतात. मध्य रेल्वेचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची माहिती खासदारांना उपलब्ध करून दिली तर ते रेल्वे अर्थसंकल्पात याचा पाठपुरावा करू शकतील. यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही संचेती यांनी केली.