शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण दलात महिलांना समान संधी देणार

By admin | Updated: October 12, 2015 05:08 IST

देशाच्या संरक्षण दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले

मुंबई : देशाच्या संरक्षण दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. १९६५ सालच्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या ५० व्या स्मृतिप्रीत्यर्थ माटुंग्याच्या वेलिंगकर एज्युकेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पर्रिकर म्हणाले की, ‘आई आणि वडील डॉक्टर असतानाही गुप्ते यांनी संरक्षण दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६५ सालच्या युद्धात वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी पाकिस्तानात जाऊन पूल उडवला आणि त्यांना वीरमरण आले. गुप्ते यांच्या बलिदानामागील भावना आयोजकांनी जमेल तितक्या शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवायला हवी, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी त्यातून प्रेरणा घेऊन संरक्षण दलाकडे वळतील.’कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस आणि गोठवून टाकणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीतही सैनिक देशाचे रक्षण करतात. मात्र, सैनिकांच्या पराक्रमांच्या आठवणी आपण केवळ डायरीमध्ये जतन करून ठेवतोय का? अशी शंका मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे गुप्ते राहणाऱ्या परिसरातील ले. दिलीप गुप्ते मार्ग परिसर मंडळाने पुढाकार घेऊन गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या या पराक्रमाची आठवण जपल्याचा आनंदही पर्रीकर यांनी व्यक्त केला.यावेळेस शहीद गुप्ते यांचे लहान भाऊ डॉ. राजन गुप्ते यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात संरक्षण दलातून मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाचे कौतुक केले. कामगिरीवर जाण्याआधी भावाने लिहिलेल्या पत्राची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वयाच्या २३ व्या वर्षी इतकी प्रगल्भता दलाच्या प्रशिक्षणातूनच आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ले. दिलीप गुप्ते यांच्यावर लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन पर्रिकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ले. दिलीप गुप्ते मार्ग परिसर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश हडकर, वुई स्कूलचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, डॉ. राजन गुप्ते, डॉ. पुष्पा जयवंत उपस्थित होत्या. या वेळेस रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर, बालमोहन विद्या मंदिरचे प्राध्यापक गुरूप्रसाद रेगे आणि गिरीश रेगे यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)