शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठाला जागा द्या - हायकोर्ट

By admin | Updated: January 15, 2017 02:28 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाकरिता पवईच्या महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल)बरोबर करार करण्यास विलंब लावू नका. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत विद्यापीठाचे

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाकरिता पवईच्या महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल)बरोबर करार करण्यास विलंब लावू नका. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत विद्यापीठाचे स्थलांतर पवईला झालेच पाहिजे, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सध्या विधी विद्यापीठाचा कारभार टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) आवारात तात्पुरत्या स्वरूपी सुरू आहे. २०१६मध्ये राज्य सरकारने राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी गोराई येथे ६० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. अद्याप सरकारने या निर्णयावर अंमलबजावणी न केल्याने राज्य सरकारला ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले प्रदीप हवनुर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.‘राज्य सरकारने महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ कायदा, २०१४ची अंमलबजावणी करूनही राज्य सरकारने निर्णयाप्रमाणे ६० एकर जागा देण्यासाठी काहीही पावले उचलली नाहीत,’ असे अ‍ॅड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.पहिल्याच वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी दुसऱ्या महाविद्यालयांत प्रवेश घेतला, अशी माहितीही माने यांनी खंडपीठाला दिली. ‘विद्यापीठाला आर्थिक साहाय्य करणे, सरकारचे कर्तव्य आहे. स्टडी हॉल, लायब्ररी व अन्य सुविधा विद्यापीठाला पुरवण्यात याव्यात. अन्यथा हे विद्यापीठ स्थापन करण्याचा सरकारचा हेतू निष्फळ ठरेल,’ असा युक्तिवाद माने यांनी केलात्यावर उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपी हे विद्यापीठ टिसच्या आवारातून पवई एमटीएनएलच्या कार्यालयात स्थलांतरित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. एमटीएनएल कार्यालयाच्या इमारतीमधील सुमारे २५ हजार चौ. फुटांचे दोन मजले रिकामे आहेत. त्यामुळे एमटीएनएलबरोबर करार करून ही जागा ताब्यात घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. (प्रतिनिधी)