शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीत मुलींची बाजी; महाराष्ट्राचा निकाल ९६%

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 08:21 IST

CBSE Result News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात महाराष्ट्रात मुलींनी सरस कामगिरी केली आहे. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के, तर मुलांचे ९६.१ टक्के आहे. राज्यातील ९६.६६ टक्के विद्यार्थिनी- विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात महाराष्ट्रात मुलींनी सरस कामगिरी केली आहे. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के, तर मुलांचे ९६.१ टक्के आहे. राज्यातील ९६.६६ टक्के विद्यार्थिनी- विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांचा निकाल ९२.८० टक्के लागला तर खासगी शाळांची घसरण झाली आहे.

सीबीएसईचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राने ९६.६६ टक्के निकाल नोंदवत नाव उज्ज्वल केले आहे. यंदा देशपातळीवर ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात किरकोळ वाढ झाली. राज्यात १,४९६ शाळांमध्ये ४४५ केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी १,३३,६६३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यांपैकी १,३३,३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालानुसार राज्यात १,२८,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूणच, यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक ठरली असून, राज्याचा निकाल ९६.६६ टक्केवारी इतका लागला.

मुंबई पालिकेच्या शाळांचा निकाल ९२.८० टक्केपालिकेच्या ११ मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई शाळांच्या ३३९ विद्यार्थ्यांपैकी ९२.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ११ पैकी चार शाळांचा निकाल १०० टक्के राहिला. मुलुंडच्या आर्या लामने ९७.८० टक्क्यांसह प्रथम, अंधेरीच्या सौरभ यादवने ९७.२० टक्क्यांसह द्वितीय, तर घाटकोपरच्या कौस्तुभ त्रिपाठीने ९७ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकावला. 

पेकीच्या पैकी टॉप थ्रीसेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई, पनवेलरायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडारायन इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली

खासगी शाळांची घसरण : अनुदानित सीबीएसई शाळांनी १०० टक्के निकालासह सर्वोच्च स्थान पटकावले असून नवोदय व केंद्रीय विद्यालयांनीही ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल नोंदवला. मात्र खासगी सीबीएसई शाळांचा निकाल केवळ ३४.१८ टक्के इतका अत्यंत कमी लागला आहे.

महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी परिक्षार्थी विद्यार्थिनी : ५७,६११     उत्तीर्ण : ५६०८५   ९७.३५%परिक्षार्थी विद्यार्थी : ७५,७७१    उत्तीर्ण : ७२,८४८  ९६.६६%

English
हिंदी सारांश
Web Title : Girls excel in CBSE 10th; Maharashtra result 96%

Web Summary : Maharashtra's CBSE 10th result shines with 96.66% pass rate. Girls outperformed boys with 97.35%. Mumbai Municipal schools achieved 92.80%. Private schools saw a decline. Across Maharashtra 1,28,933 students passed.
टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षण