शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच ठरल्या बेस्ट!

By admin | Updated: June 18, 2014 04:20 IST

बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़

पुणे : बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़ अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंबे ही ४९६ (९९.२० टक्के) गुण मिळवत राज्यात पहिली आल्याचे समजते़ राज्यातील नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के इतका लागला आहे. ‘सर्वोत्तम पाच’ (बेस्ट आॅफ फाइव्ह) या निकषानुसार निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षी दहावीचा निकाल ८३़४८ टक्के इतका लागला होता. त्यामुळे या वर्षीच्या निकालात ४़८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून, कोल्हापूर दुसऱ्या, पुणे तिसऱ्या तर लातूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी १ वाजेपासून आॅनलाइन निकाल पाहण्यास दिला आहे. २६ जून रोजी संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत. म्हमाणे म्हणाले, राज्यभरातून १५ लाख ४९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ६८ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी २१़३२ टक्के आहे. निकालात वर्चस्व राखणाऱ्या मुलींनी यंदाही निकालात आघाडी कायम ठेवली आहे़ दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नियमित मुलांची संख्या ७ लाख ३२ हजार २१८ (८६़४७ टक्के) असून, मुलींची संख्या ६ लाख ३६ हजार ५७८ (९०़५५ टक्के) आहे. मागील वर्षी मुलांच्या व मुलींच्या निकालामध्ये सुमारे दोन टक्क्यांचा फरक होता. यंदा हा फरक चार टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (प्रतिनिधी)