"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:23 IST2025-03-09T19:22:32+5:302025-03-09T19:23:59+5:30
Jayant Patil News: जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत असतात. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर पाटलांनी एक विधान केले.

"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले"
Girish Mahajan Jayant Patil: जयंत पाटील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा अधूनमधून डोकं वर काढतात. पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या असून, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'मी सगळ्यांच्या संपर्कात असतो.' यावर बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले की, 'संपूर्ण महाराष्ट्रातून संपर्क केला जातोय, पण त्यामुळे कोण कुठे संपर्क करतोय, हे मला माहिती नाहीये.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयंत पाटील भाजप नेत्याच्या संपर्कात असल्याचे चर्चा सुरू असून, याबद्दल त्यांना माध्यमांच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर पाटलांनी नेहमीच्या शैलीतून उत्तर दिले.
'सगळ्यांची माहिती ठेवायची असते'
जयंत पाटील म्हणाले, "मी सगळ्यांच्या संपर्कात असतो. सगळ्यांच्या संपर्कात असल्यावर सगळ्यांची परिस्थिती कळत नाही. सगळ्यांची माहिती राजकारणात कायम ठेवायची असते."
जयंत पाटील कुणाच्या संपर्कात, माहिती नाहीये; महाजनांचं उत्तर
गिरीश महाजन म्हणाले, "जयंतराव माझ्या संपर्कात नाहीयेत. ते कुणाच्या संपर्कात आहेत, हेही मला माहिती नाही. पण, याबाबतीत निर्णय काय असेल... पण, आमच्याकडे खूपच संपर्क वाढले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून. त्यामुळे कोण कुठे संपर्क करतोय, हे मला माहिती नाहीये. पूर्वी अनेक लोक माझ्याशी संपर्क करायचे, पण आता गर्दीच एवढी आहे की, संपर्क करणाऱ्यांची. त्यामुळे जो जवळचा असेल, त्याच्याकडे तो जात असतो."
त्यांचा निर्णय लवकरच होईल -शिंदेंची शिवसेना
"जयंत पाटील हे समजदार नेते आहेत. चांगले नेते आहेत. त्यांना योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे आणि तो ते घेतील. त्यांनी आज जे काही विधान केले आहे, त्यांनी एका अर्थाने पुष्टीच दिली आहे की, थोडावेळ थांबा मी कुठे जातोय, त्याचा निर्णय लवकरच होईल", असे विधान शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले.