शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सातबारा उता-यासाठी मोबाईलवर ओटीपी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 8:22 PM

राज्यातील शेतक-यांना डिजिटल उतारे देण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक टाकून शेतकरी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेत आहेत.

ठळक मुद्देडिजिटल स्वाक्षरीचा ठळक उल्लेख असणारआत्तापर्यंत ६ लाख ४४हजार ४३५ सातबारा उतारे डाऊनलोड या उता-यावर ‘डिजिटली साईन्ड’असा मोठ्या अक्षरात उल्लेखआत्तापर्यंत सुमारे ४० लाख सातबारा उता-यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण

राहुल शिंदे 

पुणे: राज्याच्या महसूल विभागातर्फे डिजिटल सातबारा उतारे देण्याच्या प्रक्रियेत काही धोरणात बदल करण्यात आले आहेत.त्यानुसार डिजिटल सातबारा उता-यासाठी मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक संकेतस्थळावर द्यावा लागेल. तसेच संबंधित उतारा कोणत्या सक्षम अधिका-याने आणि कोणता तारखेला डिजिटली साईन करून दिला त्याचा ठळक उल्लेख या उता-यावर असणार आहे. राज्याच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली असून आत्तापर्यंत सुमारे ४० लाख सातबारा उता-यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटल उता-यासाठी सर्व्हरवरील स्पेस कमी पडत असल्याने महसूल विभागातर्फे हे काम थांबविण्यात आले आहे. मात्र,संगणकावर व मोबाईलवर सातबारा उतारे देण्याची प्रकिया सुरू आहे.भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा उता-याचे संकेतस्थळ आॅनलाईन पध्दतीने वापर करणा-यांची संख्या मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एक हजार ७६५ एवढी होती. तसेच मंगळवारी या संकेतस्थळाला ९ हजार ६३६नागरिकांनी भेटी दिल्या असून ३ हजार ५३१ नागरिकांनी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे या संकेतस्थळाला 1 मे 2018 पासून 17 लाख १६ हजार ६३५ नागरिकांनी भेट दिली असून आत्तापर्यंत ६ लाख ४४हजार ४३५ सातबारा उतारे डाऊनलोड करण्यात आले आहेत.डिजिटल उतारे प्राप्त करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.त्यात संबंधित व्यक्तींच्या माहितीसह मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी भरावा लागतो.मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक संकेतस्थळावर टाकल्यानंतर डिजिटल सातबारा उतारे सहज प्राप्त होतात.पूर्वी डिजिटल सातबारा उता-यावर सक्षम अधिका-याचे नाव लहानशा अक्षरात लोगोवर छापले जात होते.परंतु,नवीन उता-यावर मोठ्या अक्षरात संबंधित अधिका-याचे नाव त्यााने कोणत्या तारखेला उतारा दिला,याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच संबंधित उतारा वैध किंवा अवैध आहे.हे तपासण्यासाठी विशिष्ट क्रमांक दिलेला आहे.त्यामुळे उतारे मिळणे अधिक सुलभ झाले आहे,असा दावा भूमि अभिलेख कार्यालयातील अधिका-यांकडून केला जात आहे.-----------------------------राज्यातील शेतक-यांना डिजिटल उतारे देण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक टाकून शेतकरी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेत आहेत.तसेच या उता-यावर ‘डिजिटली साईन्ड’असा मोठ्या अक्षरात उल्लेख असेल.त्याचप्रमाणे उतारा देणा-या अधिका-याचे पूर्ण नाव असेल.सध्या ही सुविधा मोफत आहे.-एस.चोक्कलिंगम,जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,महाराष्ट्र राज्य,

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीonlineऑनलाइनdigitalडिजिटलState Governmentराज्य सरकार