शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधून परतलेल्या गीताचा मराठवाडा दौरा लांबणीवर;  कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:26 IST

सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित : पंधरवडाभर उशीर होण्याची शक्यता

इंदूर (मध्य प्रदेश) : पाकिस्तानमधून पाच वर्षांपूर्वी भारतात परतलेली मूकबधीर युवती गीता आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी २ डिसेंबरपासून मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड तसेच शेजारी तेलंगणा राज्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी तिचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. तिच्याबरोबर येणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यप्रदेशच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त संचालक सुचिता तिर्की यांनी मंगळवारी सांगितले की, आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गीता बुधवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होती. परंतु, तिच्यासोबत जाणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित झाल्याने हा दौरा आता पंधरवड्यासाठी लांबणीवर टाकला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून देशाच्या विविध भागांतील २० कुटुंबीयांनी गीता हीच आपली मुलगी असल्याचे सांगितलेले आहे. परंतु, या कोणत्याही कुटुंबाचा गीतावरील दावा सिद्ध होऊ शकलेला नाही. इंदूरमध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी आनंद सर्व्हिस सोसायटी सध्या गीताची देखभाल करीत आहे. तिच्या कुटुुंबीयांना शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारने याच संस्थेवर सोपविलेली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गीता ही खाणाखुणा करून बालपणीच्या काही आठवणी सांगत आहे. त्यावरून ती मूळची मराठवाडा किंवा त्याला लागून असलेल्या तेलंगणामधील रहिवासी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती दोन दशकांपासून तिच्या कुटुंबीयांपासून दूर झाली होती.

गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.देशाच्या तत्कालीन विदेशमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती २६ ऑक्टोबर रोजी भारतात परतू शकली होती. त्यानंतर ती इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करीत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.

गीताच्या कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?सांकेतिक भाषातज्ज्ञांनी तिच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या असून, तिच्या बालपणीच्या आठवणी जागृत करीत आहेत. तिने खाणाखुणांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे. गावाजवळ नदी असून, नदीच्या किनाऱ्यावर देवीचे एक मंदिर आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड व शेजारी तेलंगणा राज्यात अशी काही ठिकाणे असून, तेथे गीताला घेऊन ते जाणार आहेत.सांकेतिक भाषातज्ज्ञांनी तिच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या असून, तिच्या बालपणीच्या आठवणी जागृत करीत आहेत. तिने खाणाखुणांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे. गावाजवळ नदी असून, नदीच्या किनाऱ्यावर देवीचे एक मंदिर आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड व शेजारी तेलंगणा राज्यात अशी काही ठिकाणे असून, तेथे गीताला घेऊन ते जाणार आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान