शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडर आता वर्षभर

By admin | Updated: August 28, 2014 03:03 IST

एका महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे एकच अनुदानित सिलेंडर मिळण्याची अट मागे घेण्यात आली असून आता ग्राहकांना वर्षभर अनुदानित १२ सिलेंडर मिळतील.

नवी दिल्ली : एका महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे एकच अनुदानित सिलेंडर मिळण्याची अट मागे घेण्यात आली असून आता ग्राहकांना वर्षभर अनुदानित १२ सिलेंडर मिळतील.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एका वर्षात १४.२ किलोचे केवळ ९ अनुदानित सिलेंडर देण्याचा निर्णय रद्द करून ती संख्या १२ केली, असे दूरसंचार व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले.आधीच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी अडचण व्हायची, असे सरकारच्या लक्षात आले. ग्राहकाला कधी एका महिन्यात एका सिलेंडरची गरज नसायची तर सणावारांच्या दिवसांत जास्त सिलेंडर लागायचे. एखाद्या ग्राहकाने एखाद्या महिन्यात सिलेंडर घेतले नाही, तर राहिलेल्या महिन्यात त्याला ते मिळायचे नाही. आता ही गैरसोय होणार नाही, असे प्रसाद म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसाद यांनी दिली.वर्षभर ग्राहकांना अनुदानित १२ सिलेंडर मिळतील. ग्राहकांची होणारी अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. १२ सिलेंडरनंतरही ग्राहकाला गरज असेल तर ते त्याला बाजार भावानुसार (१४.२ किलोसाठी ९२० रुपये) घ्यावे लागेल. राजधानी दिल्लीत हे १४.२ किलोचे सिलेंडर ४१४ रुपयांना मिळेल.या आधीच्या सरकारने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वर्षभरात १२ अनुदानित सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु दर महिन्याला सिलेंडर घ्यावे लागणार होते. ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.