अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आता महिना लोटत आला आहे. या युद्धामुळे आखातामध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची केलेली नाकेबंदी यामुळे जगातील इतर देशांबरोबरच भारतातही गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आणि वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला टोला लगावला आहे. गॅस, पेट्रोल तुडवडा हा नेहरूंमुळेच झाला असेल, अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, गॅस सिलेंडरसाठी जनता तासन् तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटेलं बंद पडली आहेत, काँग्रेस कार्यालय बाहेरील हॉटेल बंद आहेत पण सत्ताधाऱ्यांची 'बनवाबनवी' अजूनही सुरूच आहे! स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडताना भाजपला लाज वाटत नाही.पाप तुमचं आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपला घ्यायचे नसेल. हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला,भाजपची ही जुनी टेप आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत? जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या, अशी विचारणाही वडेट्टीवार यांनी केली आहे.
Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar sarcastically attributed the gas and petrol shortage to Nehru, criticizing the government for blaming others for its failures. He highlighted public suffering due to long queues and closed businesses, questioning the government's accountability and new promises.
Web Summary : कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने गैस और पेट्रोल की कमी के लिए नेहरू को दोषी ठहराते हुए सरकार की आलोचना की। उन्होंने कहा कि सरकार अपनी विफलताओं के लिए दूसरों को दोष दे रही है। उन्होंने लंबी कतारों और बंद व्यवसायों के कारण जनता की पीड़ा पर सवाल उठाया।