सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

By Admin | Updated: July 22, 2014 01:32 IST2014-07-22T01:32:35+5:302014-07-22T01:32:35+5:30

एका 15वर्षीय मुलीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती़ त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून चारही नराधमांना सोमवारी अटक केली़

Gang rape; Four arrested | सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

उदगीर (जि. लातूर) : एका 15वर्षीय मुलीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती़ त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून चारही नराधमांना सोमवारी अटक केली़
उदगीर तालुक्यातील जायभायचीवाडी येथील 16वर्षीय पीडित मुलगी रविवारी धुणो धुण्यास शेतात गेली. या वेळी केशव केंद्रे, अच्युत मुंडे, इंद्रजीत मुंडे, संदीप केंद्रे यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शिवाय, तिला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. अटकेतील चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल़े (प्रतिनिधी) 

 

Web Title: Gang rape; Four arrested