कारमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:28:55+5:302014-07-23T00:34:56+5:30

एका १७ वर्षीय युवतीवर धावत्या कारमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली

A gang rape in the car | कारमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

कारमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

जानेफळ : मेहकर तालुक्यातील कळंबेश्‍वर येथील एका १७ वर्षीय युवतीवर धावत्या कारमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना २0 जुलै रोजी घडली. या घटनेसंदर्भात २२ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार आहेत.

मेहकर तालुक्यातील कळंबेश्‍वर येथील १७ वर्षीय युवती २0 जुलै रोजी दुपारच्यावेळी शौचास गेली होती. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या इंडिका कारमध्ये आलेल्या तीन नराधमांनी मुलीच्या तोंडावर रुमाल बांधून तिला कारमध्ये बसविले. चालू गाडीमध्येच या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडित युवतीला वाशिम जिल्ह्यातील अनसिंग बसस्थानकावर सोडून दिले. या प्रकारामुळे भेदरलेल्या युवतीने एका हॉटेलमधून स्वत:च्या घरी संपर्क साधला. त्यानंतर पीडित युवतीच्या नातेवाईकांनी तातडीने अनसिंग येथे धाव घेतली. पीडित युवतीने जानेफळ पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मेहकर येथील शे.जरीन शे.जम्मा आणि दोन अज्ञात आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६ आणि ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २0१२ चे कलम ३,४,११ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार प्रभाकर मते, पोकाँ. सुरेश काळे हे करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर घटनेतील इंडिका गाडी किंवा आरोपींना ताब्यात घेण्यात आले नव्हते.

Web Title: A gang rape in the car