शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आडनावाप्रमाणेच परिस्थितीवर मात करणारा गजानन

By admin | Updated: August 17, 2014 00:43 IST

त्याच्या हाताला बोटे नसली तरीही त्याचे हस्ताक्षर मात्र सुदृढांना लाजविणारे आहे. पायालाही केवळ ‘टाचा’च आहेत; पण तरीदेखील तो स्वत:ची संपूर्ण कामे स्वत: करतो़ तो कुणावर ओझे नसला तरी नियतीपुढे हतबल आहे.

जन्मत:च अपंगत्व : इच्छाशक्ती असताना परिस्थितीने हतबल; काम मिळत नसल्याची खंतकिशोर तेलंग- तळेगाव (टा़) वर्धात्याच्या हाताला बोटे नसली तरीही त्याचे हस्ताक्षर मात्र सुदृढांना लाजविणारे आहे. पायालाही केवळ ‘टाचा’च आहेत; पण तरीदेखील तो स्वत:ची संपूर्ण कामे स्वत: करतो़ तो कुणावर ओझे नसला तरी नियतीपुढे हतबल आहे. कॅरम खेळात उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचे सुंदर हस्ताक्षर असतानाही त्याच्या शारीरिक व्यंगाकडे पाहून कुणीही काम द्यायला तयार नाही, ही त्याची व्यथा आहे. तो आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्याचे नाव गजानन शंकर मातकर असे आहे. जन्मत:च त्याच्या हाताला बोटेच नव्हे तर पंजाही नाही. पायालाही बोटे नाहीत. पण दुर्दम्य आत्मविश्वास आणि ध्येयाने तो परिस्थितीशी लढतो आहे़ गजानन मूळचा देवळी येथील रहिवासी! तो तळेगावनजीकच्या धोत्रा कासार येथे आई-वडिलांसोबत १५ वर्षांपासून राहतो. तीन एकर शेतावर राबून आई-वडील गजाननचा सांभाळ करतात. त्यांची आणखी तीन मोठी मुलेदेवळी येथे वास्तव्यास आहेत. गजानन मार्च-१९९८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. पुढे शिकण्याची इच्छा असताना परिस्थितीमुळे तो शिकू शकला नाही़ आर्थिक परिस्थिती बेताची आणि काम कुणी देत नसल्याने तो हताश झाला; पण मनाने खचला नाही़ दोन्ही मनगटांमध्ये पेन धरून तो कागदावर सुंदर हस्ताक्षर उतरवितो़ जेवण करतानाही त्याला कुणाच्या मदतीच्या गरज नाही़ पाय नसले तरी कुणाच्या आधाराची गरज नाही़ एखाद्या संस्थेत कारकुनाची नोकरी मिळावी म्हणून त्याने पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या; पण उपयोग झाला नाही. त्यामुळे आपणही चार पैसे कमवावेत, ही त्याची इच्छा अर्धवटच आहे़ त्याला शेतीची कामे करता येत नसल्यामुळे तो अन्य कामाच्या शोधात असतो़ सर्व अवयव व्यवस्थित असताना अनेकांना जे जमत नाही, ते तो करतो़ पडेल ते काम करायचे; पण कुणाकडे भीग मागायची नाही, असा निश्चय त्याने केला आहे़ तो उत्कृष्ट कॅरम खेळतो. वाचनाची प्रचंड आवड आहे. शासनाने या होतकरू तरुणाची दखल घेतली तर त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकेल़ आडनावाप्रमाणे अनेक अडचणींवर मात करीत गजानन जीवन जगत असला तरी संघर्षाला स्थैर्य मिळणे गरजेचे आहे़