अमेरिकेत निघणार गजानन महाराजांची पालखी

By Admin | Updated: August 20, 2014 00:37 IST2014-08-20T00:37:23+5:302014-08-20T00:37:23+5:30

माऊली झाली ‘ग्लोबल’!, ऋषीपंचमीनिमित्त आयोजन

Gajanan Maharaj's Palkhi leaves for America | अमेरिकेत निघणार गजानन महाराजांची पालखी

अमेरिकेत निघणार गजानन महाराजांची पालखी

बुलडाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांचा भक्तसंप्रदाय जगभर पसरला आहे. या भक्त मंडळीच्या माध्यमातून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा यंदा अमेरिकेतही होणार असून, त्यासाठी साता समुद्रापार असलेल्या श्रींच्या भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
अमेरिकेतील केलीफोर्नियामध्ये संत गजानन महाराजांवर ङ्म्रद्धा असलेल्या भक्तांनी संत गजानन महाराज अमेरिका परिवार नावाची संस्था स्थापन केली आहे. यामध्ये अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रासह देशभरातील भक्तांचा समावेश आहे. हा परिवार संत गजानन महाराजांच्या नावाने विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे करीत असतो. येत्या ३0 ऑगस्ट रोजी, ऋषी पंचमीला संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असून, या सोहळयाच्या अनुषंगानेच ७ सप्टेंबर रोजी ङ्म्रींची पालखी निघणार आहे. तेथील हायरेस्ट सर्कल, इर्विन सेंट्रल येथून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता २ किलोमीटरच्या परिक्रमेत ही पालखी निघणार असून, यावेळी भक्तांकडून गण गण गणात बोतेचा गजर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळयानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. संत गजानन महाराज, अमेरिका परिवारची वेबसाईट आणि फेसबूक पेजवर या सोहळय़ाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
या परिवारातील योगेश जाधव हे परभणी जिल्ह्यातील उकडगावचे मूळ रहिवासी असून, ते आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. गजानन महाराजांप्रती येथील भारतियांमध्ये अपार ङ्म्रद्धा असून, विविध धार्मिक उत्सव भारताप्रमाणेच आम्ही येथेही साजरे करतो. संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळयात किमान २00 भक्त सहभागी होतील, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Gajanan Maharaj's Palkhi leaves for America