शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा आज जंगी सत्कार

By admin | Updated: May 27, 2014 01:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नागपूरचे सुपुत्र नितीन गडकरी यांना महत्त्वाचे स्थान मिळाल्याने नागपूरकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. गडकरी यांचे उद्या, मंगळवारी

विमानतळावरून रॅली : चिटणीस पार्कवर सोहळा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नागपूरचे सुपुत्र नितीन गडकरी यांना महत्त्वाचे स्थान मिळाल्याने नागपूरकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. गडकरी यांचे उद्या, मंगळवारी दुपारी ४ वाजता विशेष विमानाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. येथे कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत होईल. विमानतळ ते चिटणीस पार्कपर्यंत भव्य रॅली निघेल. सायंकाळी ६ वाजता चिटणीस पार्क येथे गडकरींचा जाहीर सत्कार केला जाईल. या सत्कार सोहळ्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांसह विदर्भातील दहाही खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे. नागपूरची जागा गडकरींनी रेकॉर्डतोड मतांनी जिंकली. नागपूरकांनी मतदानातून गडकरींवर असलेले प्रेम व्यक्त केले. आता मंत्री बनून येत असलेल्या गडकरींच्या स्वागतासाठी नागपूरकर आसुसलेले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी गडकरी यांचा जन्मदिवस असल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. गडकरी विमानतळावर पोहोचल्यावर सर्वप्रथम डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करतील. यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून धन्यवाद देतील. येथून स्वागत रॅली सुरू होईल. या रॅलीत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांच्यासह विदर्भातील खासदार उपस्थित राहतील. नेत्यांसाठी एका ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिला आकर्षकरीत्या सजविले जाईल. रॅली वर्धा रोड, कॉटन मार्केट, महालमार्गे चिटणीस पार्क पोहोचेल. रॅलीचा समारोप करताना उपमहापौर जैतूनबी यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यक समाजातर्फे बॅण्डबाजासह गडकरींचे स्वागत केले जाईल. यानंतर चिटणीस पार्क येथे गडकरींचा सत्कार होईल. महापौर अनिल सोले, खा. अजय संचेती, प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित आदी यावेळी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)