शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचे ‘ग्रॅन्ड वेलकम’

By admin | Updated: May 28, 2014 01:09 IST

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही येणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाल येथील गडकरी वाड्यावर हजाराहून अधिक कार्यकर्ते व

नागपूर : केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही येणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाल येथील गडकरी वाड्यावर हजाराहून अधिक कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी जमा झाली होती. ढोलताशांचा गजर, कार्यकर्त्यांकडून देण्यात येणार्‍या घोषणा अन् संपूर्ण परिसरात झालेली जोरदार आतषबाजी यामुळे महाल परिसर उजळून निघाला होता.

गडकरी रात्री ९ च्या सुमारास घरी येणार याची माहिती मिळाल्याने सायंकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गडकरी वाड्याच्या परिसरात जमायला सुरुवात केली होती. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला मिठाई वाटण्यात येत होती. रात्री १० वाजताच्या सुमारास गडकरी यांचे आगमन झाले अन् संपूर्ण परिसर ‘नितीन गडकरी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैह्णच्या घोषणांनी निनादून गेला. गडकरी यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकरराव देशमुख, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, महापौर अनिल सोले हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे परिसरात शहराच्या निरनिराळ्या वॉर्डातील नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारीदेखील शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

आबालवृद्धांची गर्दी नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी केवळ कार्यकर्त्यांचीच गर्दी होती असे नाही, तर नागपुरातील सर्व धर्माचे सामान्य नागरिकदेखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. शेकडो महिला, ज्येष्ठ नागरिक यांनीदेखील गडकरींना शुभेच्छा दिल्या. काही महिलांनी गडकरींसाठी खास घरून मिठाई आणली होती. प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे सर्वांचे स्वागत करणे शक्य झाले नाही; तरीदेखील गडकरी वाड्यावर पाणी व शीतपेयाची सोय करण्यात आली होती. रोशनाई अन् रांगोळी नितीन गडकरी यांना मिळालेले मंत्रिपद आणि त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने गडकरी वाड्यावर सजावट करण्यात आली होती. वाड्यावर करण्यात आलेली रोशनाई व गडकरींचा चेहरा दर्शविणारी रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय जागोजागी फुगेदेखील लावण्यात आले होते. गडकरींच्या वाढदिवसानिमित्त केकदेखील मागविण्यात आला होता. गडकरींच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा त्यांना ओवाळले. (प्रतिनिधी)