भावी शिक्षकांची हजेरी आता ‘बायोमेट्रीक’ पद्धतीने!

By Admin | Updated: December 30, 2014 00:02 IST2014-12-30T00:02:11+5:302014-12-30T00:02:11+5:30

खासगी महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविणार उपक्रम : ‘एनसीटीई’चा प्रस्ताव

Future teacher's attendance is now 'Biometric'! | भावी शिक्षकांची हजेरी आता ‘बायोमेट्रीक’ पद्धतीने!

भावी शिक्षकांची हजेरी आता ‘बायोमेट्रीक’ पद्धतीने!

नागेश घोपे/वाशिम:  दज्रेदार शिक्षकांची फळी उभी करण्यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने अध्यापक पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे धडे गिरविणार्‍या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना यामुळे चाप बसणार असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा परिषदेला विश्‍वास आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून खासगी महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. एकेकाळी नोकरीची हमखास हमी देणारे अध्यापक अभ्यासक्रम आता बेरोजगारांची फौज निर्माण करणारे कारखाने होऊन बसले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे ह्यग्लॅमरह्ण संपले आहे. परिणामी विद्यार्थ्यांंनाही फारसे गांभिर्यही उरले नसून, हा अभ्यासक्रम शिकविणार्‍या विद्यालय व महाविद्यालयांची परिस्थिती गंभीर झाली आहे. दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा सरळ परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून भावी शिक्षकांमध्येच गुणवत्ता नसेल, तर ते विद्यार्थी कसे घडवतील, असा कळीचा मुद्दा यानिमित्ताने समोर आला होता. या मुद्यावर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने ठोस पाऊले उचलण्याची तयारी केली आहे. बीएड अभ्यासक्रम दोन वर्षाचा करणे हा त्यातील पहिला टप्पा असून, विद्यार्थ्यांंची बायोमेट्रीक हजेरी हा दुसरा टप्पा आहे. अध्यापक पदविका, पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम शिकविणार्‍या खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव परिषदेने तयार केला आहे. या प्रस्तावावर विद्या परिषदेत चर्चा होणार आहे. चर्चेनंतर राज्यभरात त्याची अमंलबजावणी होणार आहे.

Web Title: Future teacher's attendance is now 'Biometric'!