शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:23 IST

Ladki Bahin Yojana and NCP Ajit Pawar: महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्रीच या योजनेबद्दल तक्रार करत असल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महायुतीला सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजने’बाबत आता मंत्रीच तक्रार करू लागले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांना निधी मिळायला उशीर होतो, असे वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तर या योजनेमुळे इतर योजनांना पैसे येण्यास उशीर होत असल्याचे कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून यापूर्वी निधी वर्ग करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. आता महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्रीच या योजनेबद्दल तक्रार करत असल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

मंत्री भरणे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, मी इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांना जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज लाडक्या बहिणींमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय. थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू पूर्ववत यायला लागली आहे.

‘प्राधान्य कशाला हे सरकारने ठरवायचे’भरणे यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता भुजबळ म्हणाले की, यात लपवण्यासारखे काही नाही, स्वाभाविक आहे. घरी अचानक एक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते.लाडकी बहीण योजनेसाठी ४५,००० कोटी बाजूला काढायचे आहेत. त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल. पहिले कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते.भरणे यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस