शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

FTIIच्या विद्यार्थ्यांना ३ वर्षांपेक्षा अधिक काळ वसतीगृहात राहता येणार नाही - गजेंद्र चौहान

By admin | Updated: June 23, 2016 14:29 IST

‘एफटीआयआय’च्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना ३ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ -  ‘एफटीआयआय’च्या (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ) वादाचे केंद्रबिंदू ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘एफटीआयआय’च्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना ३ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. चौहान यांच्या या वक्तव्यामुळे ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत.
 
आणखी बातम्या :
गजेंद्र चौहान यांचा ‘सीव्ही’ केवळ एका परिच्छेदाचा !
टीका झाली म्हणून पद सोडणार नाही - गजेंद्र चौहान

‘एफटीआयआय’मध्ये ३ वर्षांचा ‘सेमिस्टर’ प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षात विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करु शकले नाहीत, तर एक वर्ष वाढवून दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच ३ वर्षांचे शुल्क घेतो. त्यामुळे वाढविलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये राहता येणार नाही. याबाबत विद्वत्त परिषदेमध्ये निर्णय झाला आहे. आता प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले.
 
आणखी बातम्या :
अमिताभ बच्चन, रजनीकांतना डावलून झाली गजेंद्र चौहान यांची नियुक्ती
गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा- ऋषी कपूर
 
दरम्यान, गुरुवारी सकाळी गजेंद्र चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. ‘एफटीआयआय’च्या वादानंतर त्यांनी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली. याबाबत विचारणा केली असता सरसंघचालक मला पित्यासारखे आहेत. त्यामुळेच मुलाच्या लग्नाचे पहिले आमंत्रण सरसंघचालकांना देण्यासाठी आलो असल्याचे चौहान यांनी सांगितले.