शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांना हवेत फुकटचे अंगरक्षक

By admin | Updated: May 19, 2016 03:52 IST

ठाणे महापालिकेत प्रोटोकॉल म्हणून पाच पदाधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना अंगरक्षक दिले जातात.

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- ठाणे महापालिकेत प्रोटोकॉल म्हणून पाच पदाधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना अंगरक्षक दिले जातात. सध्या ठाणे शहरात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे तसेच पाणीकपात संकटामुळे अधिकारी वर्गाला अतिरिक्त अंगरक्षक ठेवावे लागले आहेत. मात्र, असेच अंगरक्षक दहा प्रभाग समिती अध्यक्ष व चार विषय समिती सभापतींनाही द्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्यांनी प्रशासनाकडे केली असल्याने सुरक्षारक्षक बोर्डाकडून अधिकचे सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची वेळ पालिकेवर येणार असून त्याचा आर्थिक बोजा ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे. हे अंगरक्षक ठाणे महापालिकेच्या आस्थापनावरील आरक्षक म्हणून काम करणारा वर्ग असतो. गेली काही वर्षे त्यांची भरती झालेली नसल्याने आणि सध्या ती प्रक्रि या सुरु असली तरी पालिकेत या आरक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक बोर्डाचे ५५० हून अधिक सुरक्षारक्षक प्रशासनाला तैनात करावे लागत आहेत.ते पालिकेच्या मालमत्ता आणि शिक्षण मंडळाची देखरेख करत आहेत.जोवर आरक्षक भरती होऊन ते कामावर उपस्थित होत नाहीत तोवर हे रक्षक काम करणार आहेत. आवश्यकतेनुसार अधिकचे सुरक्षारक्षक हे बोर्डाकडून मागवावे लागणार आहेत. त्यासाठी पालिकेला लाखो रु पयांचा खर्च करावा लागत आहे.असे असताना आता प्रभाग समिती अध्यक्ष, विषय समिती सभापतींना अंगरक्षक पुरवण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेकडून झालेली आहे. एखाद्या अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना अंगरक्षक पुरवणे हे कायद्याचे काम आहे. मात्र एक प्रोटोकॉल म्हणून अंगरक्षक देण्याचे काम पालिकेकडून होत असताना त्याचा गैरफायदा अन्य पदाधिकारी घेण्यास पुढे आल्याचे दिसून येते. ।प्रस्तावाचा प्रवास पीडब्ल्यूडीतचविशेष म्हणजे पालिकेकडे अवघे पाच अंगरक्षक हे बंदुकधारी आहेत. शिवसेना गटनेते संतोष वडवले यांनी ही प्रस्तावाची सूचना केलेली असून ती उपायुक्त मुख्यालय यांच्याकडून सुरक्षा अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर होणे अपेक्षित असताना हा प्रस्ताव पीडब्लूडी विभागाकडे फिरत आहे. याबबत सुरक्षा अधिकारी सुनील मालवणकर यांना विचारले असता त्यांनी अद्याप हा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नसून आल्यास पालिका धोरणानुसार योग्य कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. महापौर, उपमहापौर,सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्ष नेते या पदाधिकाऱ्यांना अंगरक्षक दिले गेले आहेत.