शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘सिकलसेल’ रुग्णाला मोफत एसटी प्रवास

By admin | Updated: March 12, 2015 05:11 IST

सिकलसेल’ या अनुवंशिक रक्त दोष असणाऱ्या आजारग्रस्तांना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

मुंबई : ‘सिकलसेल’ या अनुवंशिक रक्त दोष असणाऱ्या आजारग्रस्तांना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बहुतांशी आदिवासी आणि मागासवर्गीय समाजामध्ये आढळणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचाराकरीता ग्रामिण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात जावे लागते. त्यामुळे प्रवासात अशा रुग्णांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत असल्याचे निदशर्नास आले. हे पाहता सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एका मदतनिसासह मोफत एसटी प्रवास देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. हा आजार नियंत्रणात यावा यासाठी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २0 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत या आजारावर कायमस्वरुपी उपचार उपलब्ध असल्याचे आढळून आलेले नाही. सिकलसेल आजाराने ग्रस्त रुग्णांना तपासणी आणि औषधोपचाराकरीता वारंवार रुग्णालयात जावे लागते आणि प्रवासात मोठ्या मनस्तापाबरोबरच खर्चालाही तोंड द्यावे लागते. हे पाहता ५ फेब्रुवारी २0१५ रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार राज्यातील सिकलसेलने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्याच्या एका मदतनीसाला मोफत एसटी प्रवास सवलत देण्याबाबतची योजना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार मोफत प्रवास रुग्ण आणि त्याचा मदतनीसास देण्याचे ठरले. (प्रतिनिधी)