चार चाकी वाहनाने दिली चौघांना धडक : दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 14:42 IST2019-04-27T14:41:13+5:302019-04-27T14:42:30+5:30
तीन चाकी आॅटोलाही धडक दिली.

चार चाकी वाहनाने दिली चौघांना धडक : दोन गंभीर जखमी
सोनाळा - संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा बस थांब्यावर शनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान अचानक अपघात घडला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन गंभीर आहेत. जखमींना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून दोन गंभीर जखमींना अकोला येथे हलवण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, टूनकीकडून भरधाव वेगाने येणारे चार चाकी वाहन क्र.एमएच०७-बी ७००० हिने बस थांब्यावर उभे असलेले चौघांना जोरदार धडक दिली. यामध्ये दिनकर राहणे (वय ६५) रा. सोनाळा तर गौरव भारसाकळे (वय ५) रा. खामगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. राहणे यांच्या डोक्याला मार लागला असून गौरवच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली इतर दोघे जखमी आहेत. या चारचाकी वाहनाने घटनास्थळावर उभे असलेल्या दुचाकी क्र.एमएच२८-एव्ही ४९०८ ला धडक दिल्याने या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये तीन चाकी आॅटोलाही धडक दिली. सदर वाहन चालक शे.शफी स्वत:हून सोनाळा पोलीस स्टेशनला हजर झाला.