वसईमधून चार अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता

By Admin | Updated: September 13, 2016 12:55 IST2016-09-13T12:55:34+5:302016-09-13T12:55:34+5:30

वसई तालुक्यातून एकाच दिवशी दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चार शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

Four minor students missing from Vasai | वसईमधून चार अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता

वसईमधून चार अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता

>
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १३ -  वसई तालुक्यातून एकाच दिवशी  दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चार शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.नालासोपारा आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील परिसरातून अब्दुल समिद बिलाल शेख(१३) हा आपल्या राहत्या  घराजवळून दुपारी दोनच्या सुमारास गायब झाला असल्याची तक्रार त्याची आई बिल्किसबानो शेख हिने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली.
 वसईतील वालीव येथील भाजी विक्रीचा व्यवसाय करणा-या महेशकुमार सिंह यांचा मुलगा ऐश्वर्य महेशकुमार सिंह (१२) हा दुपारी एकच्या सुमारास नायगाव येथे मित्राच्या घरी गेलेला पुन्हा आपल्या घरी परतलाच नाही. त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पूर्व येथून दोन अल्पवयीन मुली  गायब झाल्या आहेत.प्रमिला अनंतकुमार पाठक(१५)हि त्यांच्या शेजारीच राहणारी मुलगी  साकीर अन्सारी (११) हिच्या सोबत नाक्यावर गणपतींसाठी फुलांचा हार आणण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता गेल्या होत्या.त्या दोघी पुन्हा परतल्याच नाहीत.म्हणून प्रमिलाची आई गीता अनंतकुमार पाठक यांनी  वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Four minor students missing from Vasai