पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीधर गुप्ते यांचे निधन

By Admin | Updated: March 12, 2015 01:45 IST2015-03-12T01:45:16+5:302015-03-12T01:45:16+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (८२) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली असा परिवार आहे.

Former University Vice-Chancellor Shridhar Gupte passed away | पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीधर गुप्ते यांचे निधन

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीधर गुप्ते यांचे निधन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (८२) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली असा परिवार आहे.
१९ एप्रिल १९८९ ते १८ एप्रिल १९९५ दरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचे माध्यमिक शिक्षण नुतन मराठी विद्यालयात तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण फर्ग्युसन व वाडीया कॉलेजमध्ये झाले. गोव्याचा आर्थिक भूगोल या विषयात त्यांनी पीएच.डी.पदवी घेतली. गुप्ते यांच्या कार्यकालात विद्यापीठाच्या आवारात आयुका, एनसीआरए या राष्ट्रीय संस्था विद्यापीठाच्या आवारात सुरू झाल्या. १० फेब्रुवारी २०१० रोजी त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Former University Vice-Chancellor Shridhar Gupte passed away