शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 08:36 IST

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

मुंबई :  माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार आहेत. 

आज दुपारी साडेबारा वाजता भाजपाच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. तसेच, अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.  

अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून ४८ तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, आज अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताअशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी १५ फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. राज्यसभेसाठी नामंकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे, त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. तसेच, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात. ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपाचा अतिरिक्त उमेदवाराचा विजय होईल. तसेच यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र