शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन

By admin | Updated: December 2, 2014 14:55 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले हे उत्तम प्रशासक व धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते.  

अब्दुल रेहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यात झाला होता. कला शाखेत पदवी घेतल्यावर अंतुले यांनी कायद्याचीही पदवी घेतली होती. १९४५ पासून अंतुले यांनी सामाजिक कार्यात सक्रीय झाले. १९६२ ते १९७६ या कालावधीत ते आमदार म्हणूनही निवडून आले. या कालावधीत त्यांनी न्याय, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांचे कामकाज पाहिले. गांधी घराण्याचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. १९७६ मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आणीबाणीच्या काळात राज्यसभेत त्यांनी खंबीरपणे इंदिरा गांधी यांची पाठराखण केली होती. १९८० साली राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले व अंतुले यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. धडाडीचे आणि झटपट निर्णय व उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच छाप पाडली. अनेक वर्षांपासून रखडलेले जिल्ह्यांचे विभाजनही अंतुलेनी झटपट करुन दाखवले. लोकहितासाठी त्यांनी विविध योजनाही राबवल्या. शेतक-यांना कर्जमाफी, पेंशनवाढ, संजय गांधी निराधार योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अंतुलेंनी घेतले. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून अंतुले ओळखले जात होते.  मात्र इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी सिमेंट घोटाळा झाला व अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. 

१९८५ मध्ये अंतुले पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. १९८९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व त्यानंतर ते केंद्रातच रमले. केंद्रात आरोग्य, जलसंवर्धन अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणूून काम केले होते. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गींतेनी अंतुले यांचा पराभव केला व त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणापासून दूर गेले.

ए. आर. अंतुले हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. रायगडमधील आंबेत या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक व खंबीर नेतृत्व गमावले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.