शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक खरेदीच्या एसएमएसची विक्रेत्यांना सक्ती

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

मुद्रांक शुल्काच्या खरेदीवर राज्यात रोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मात्र खरेदी झालेल्या मुद्रांकांची नोंद शासनाला उशिरा कळविली जाते. यातून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा फटका बसतो.

महत्त्वपूर्ण पाऊल : महसूल चोरी रोखण्यासाठी नवा फंडारूपेश उत्तरवार - यवतमाळ मुद्रांक शुल्काच्या खरेदीवर राज्यात रोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मात्र खरेदी झालेल्या  मुद्रांकांची नोंद शासनाला उशिरा कळविली जाते. यातून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा  फटका बसतो. सोबतच  खरेदीच्या वेळी खरे कारण लपविले जाते. प्रत्यक्षात मुद्रांक दुसर्‍याच  कामासाठी वापरला जातो. त्याचा उल्लेख होत नाही. महसुलाची चोरी रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क  विभागाने खरेदीचा एसएमएस सक्तीचा केला आहे. तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.काही वर्षांपूर्वी देशात मुद्रांक घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे शासनाला कोट्यवधीचा  फटका बसला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने पावले उचलले  आहेत. ज्या व्यक्तीसाठी मुद्रांक घेतला त्या व्यक्तीचे नाव आणि खरेदी करणार्‍या व्यक्तीचे नाव  मुद्रांकावर सक्तीचे करण्यात आले आहे. त्याकरिता खरेदी करणार्‍याची स्वाक्षरी आवश्यक आहे.  पूर्वी मुद्रांक खरेदी करताना तो कशासाठी हवा असे तोंडी विचारले जात होते. मात्र त्याचा उल्लेख  मुद्रांकावर येत नव्हता. आता मुद्रांक खरेदी करण्याचे कारण नमूद करण्याचे आदेश आहेत.  सोबतच त्याचा संपूर्ण पत्ता, परवाना क्रमांक,  विक्रीचे ठिकाण, दिनांक, खरेदीपासून सहा महिन्यात  त्याचा वापर आदी बाबी वैध ठरविण्यात आल्या आहेत.हा मुद्रांक सहाय्यक निबंधकाकडे नेल्यानंतर अल्ट्रा व्हायोलट किरणावर तपासता येणार आहे.  सोबतच तो ज्या व्यक्तीने विकला त्या व्यक्तीला फोनकरून खातरजमा करता येणार आहे. अन्यथा  एसएमएस प्रणालीच्या सॉफ्टवेअरवर तपासणी येणार आहे. यामुळे मुद्रांक विक्री आणि  खरेदीमधील ताळमेळ तपासण्यास मदत होणार आहे. मुद्रांक बोगस तर नाही ना याची खात्री करता  येणार आहे.यासंपूर्ण प्रक्रियेने शासनाच्या महसुलात वाढ होईल. सोबतच बोगस मुद्रांक व्यवहारात आल्यास ते  कोणाकडून आले याची माहिती क्षणार्धात मिळणे शक्य होणार आहे. खरेदी झालेला मुद्रांक  खरेदीच्या तारखेपासून सहा महिन्यात वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मुद्रांकाचा  केला जाणारा कृत्रिम साठा थांबविता येणार आहे. यामुळे मुद्रांक विक्रीतून शासनाला मिळणारा  महसूल वाढण्यास मदत होणार आहे.