शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

आयकर खात्याकडून तीन बँकांमध्ये झाडाझडती

By admin | Updated: March 17, 2017 03:19 IST

पॅन, आधार कार्डची केली चाचपणी.

अकोला, दि. १६- नोटाबंदीच्या काळात खासगी बँकेत झालेल्या आक्षेपार्ह उलाढालीवर लक्ष केंद्रित करून प्राप्तिकर विभागाकडून अकस्मात भेटी देऊन झाडाझडती सुरू केली आहे. अकोल्यातील तीन बँकांमध्ये नागपूरच्या आयकर विभागाने मंगळवारी अकस्मात भेट देऊन झाडाझडती घेतली. बँक खात्यातून दोन ते दहा लाखांच्या दरम्यान झालेल्या उलाढालीची माहिती या अधिकार्‍यांनी घेतली. ज्या खात्यात ही रक्कम जमा झाली, त्या खातेदाराचा आधार कार्ड, पॅन कार्ड याची चाचपणी करीत उत्पन्नाचे स्रोत या अधिकार्‍यांनी तपासले. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीदरम्यान ज्या बँक खात्यांमध्ये दोन ते दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली, तसेच ज्या खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली, अशांची नोंद आधीच आयकर विभागाकडे पोहोचली होती. अकोल्यातील नामांकित असलेल्या तीन बँकांच्या या आक्षेपार्ह उलाढालीवर लक्ष केंद्रित करून ईडीने तपासणी केली. त्यांचा अहवाल गेल्यानंतर मंगळवारी नागपूर आयकर विभागाचे पथक अकोल्यात दाखल झालेत. दोन दिवसांत या तिन्ही बँकांमधील व्यवहारांची पडताळणी या अधिकार्‍यांनी केली. यासाठी दोन दिवस नागपूरच्या आयकर विभागाची टीम अकोल्यात तळ ठोकून होती. दरम्यान, बुधवारी हे पथक सायंकाळी रवाना झाले. याबाबत एका बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. कोणतीही माहिती बँकेने दडवून ठेवली नसल्याचे त्यांनी ह्यलोकमतह्ण ला सांगीतले. दरम्यान, समाधान होईपर्यंत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली. आता पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.