वर्धा येथे खासगी बस पेटून ५ ठार

By Admin | Updated: May 29, 2014 09:18 IST2014-05-29T09:18:25+5:302014-05-29T09:18:59+5:30

- वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी बसने पेट घेतल्याने पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Five people were killed in a private bus at Wardha | वर्धा येथे खासगी बस पेटून ५ ठार

वर्धा येथे खासगी बस पेटून ५ ठार

ऑनलाइन टीम

वर्धा, दि. २९ - वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी बसने पेट घेतल्याने पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 
सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार, गुरूवारी पहाटे महामार्गावर तळेगावजवळ या बसने अचानक पेट घेतला. ही घटना घडली त्यावेळेसे बसमधील प्रवासी झोपेत होते, या अपघातात आत्तपर्यंत पाच प्रवासी ठार झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच प्रशासन व आजूबाजूच्या गावातील नागरिक घटनास्थळी पोहचले व त्यांनी प्रवाशांना बस बाहेर काढले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.  
 

Web Title: Five people were killed in a private bus at Wardha