महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 18:47 IST2018-05-23T18:37:58+5:302018-05-23T18:47:30+5:30

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत.

Five MLAs from Maharashtra escaped from terrorist attacks |  महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले 

 महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. हल्ल्यातून बचावलेल्या आमदारांमध्ये विक्रम काळे यांच्यासह तुकाराम काते, किशोरआप्पा पाटील, , सुधीर पारवे, दीपक चव्हाण  या आमदारांचा समावेश आहे. 

महाराष्ट्रातील हे आमदार पंचायत राज समितीच्या कामासाठी काश्मीर दौऱ्यावर गेले होते.  हे आमदार अनंतनाग जिल्ह्यातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तसेच ग्रेनेड फेकले. मात्र या आमदारांच्या वाहनचालकाने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

Web Title: Five MLAs from Maharashtra escaped from terrorist attacks