शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:28 PM

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाच नगरसेवक स्वगृही परतणार

मुंबई: राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. गेल्याच आठवड्यात अहमदनगरच्या पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. त्याबद्दल शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले पाच नगरसेवक स्वगृही परतणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला. महाविकास आघडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता माघारी परतणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीत नगरसेवकांच्या घरवापसीचा निर्णय झाला. यावेळी पाचही नगरसेवक उपस्थित होते. हे नगरसेवक मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारनेरमधील फोडाफोडीच्या राजकारणावर पडदा पडणार आहे.पारनेरमध्ये झालेलं राजकारण, मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संपर्क करून देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्यानं शरद पवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतं आहे.शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार