शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 06:40 PM2020-07-04T18:40:24+5:302020-07-04T18:41:17+5:30

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्काच मानला जातोय.  

Ahmednagar News: 5 Shiv Sena corporators joins NCP in presence of Ajit Pawar | शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

Next

अहमदनगर/मुंबईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये छोट्या-मोठ्या विषयांवरून कुरबुरी सुरू असल्याची, खटके उडू लागल्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसची नाराजी अनेकदा समोर आली आहेच, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेदांची चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकू येतेय. अशातच, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्काच मानला जातोय.  

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेचे पाच नगरसेवक आज बारामतीला पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. मुदस्सीर सय्यद, किसन गंधाडे, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने आणि वैशाली औटी यांच्यासह शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही उद्धव ठाकरेंवर नाराज; पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याआधी पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवलं होतं. आता मात्र राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या ताफ्यात घेतलं. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिलेदारांच्या हातावरच घड्याळ बांधलंय. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा धक्का ठरू शकतो.

प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती

भाजपा प्रदेश कार्यकारिणी: खडसे, तावडे, मेहतांना पुन्हा डावलले; पंकजा वेटिंगवर, बावनकुळेंचे जमले

नगराध्यक्षपदावरून नगरसेवक आणि विजय औटी यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याचं बोललं जातंय. मात्र, तालुक्यासोबतच शहरातही वर्चस्व वाढवण्यासाठी निलेश लंके यांनी ही खेळी केल्याचीही कुजबूज आहे. आता नगरपंचायतीत शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक उरलेत. त्यामुळे पुढची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असेल.

Web Title: Ahmednagar News: 5 Shiv Sena corporators joins NCP in presence of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.