‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 05:34 PM2020-07-03T17:34:51+5:302020-07-03T18:29:01+5:30

लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही..

‘I am telling you once ... otherwise you will have to suffer the consequences’: Ajit Pawar | ‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत मेगा बैठक

पुणे : पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात संक्रमण वाढत आहे.‘ मुंबईमध्ये कोरोनाची संख्या नियंत्रणात येऊ शकते मग पुण्यात काय अडचण आहे’, मी तुम्हाला आता एकदाच सांगतोय, मला परत.. परत सांगायला लावू नका.. नाही तर परिमाण भोगावे लागतील,अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीट खरडपट्टी काढली.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शुक्रवार (दि.३) रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भांत मेगा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत सध्या करण्यात येत असलेल्या उपया-योजनाबाबत नाराजी देखील व्यक्त केली. यावेळी बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत अजित पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तासह, ग्रामीण पोलिस यांना चांगलेच धारेवर धरले.

अजित पवार म्हणाले, लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही, नागरिक सर्रास मोठ्या प्रामाणात मास्क न लावता फिरत आहेत, लग्नांमध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांवर कोणाचे निर्बंध राहिले नाहीत, अनेक ठिकाणी सुरक्षित सामाजित अंतर राखले जात नाही असे असताना यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची प्रचंड वेगाने वाढली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार नुसार निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, मास्क व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील पवार यांनी दिले.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवा, यासाठी दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागासाठी तातडीने स्वतंत्र टेस्टींग इन्चार्ज म्हणून स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे निर्देश देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होणार नाही हे लक्षात ठेवा.तसेच अनेक रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे, अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश देखील पवार यांनी दिले.

अजोय मेहता म्हणाले, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा महत्त्वपूर्ण सूचना मेहता यांनी केल्या. 

Web Title: ‘I am telling you once ... otherwise you will have to suffer the consequences’: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.