शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाच दोषींना फाशी, सात आजन्म तुरुंगात

By admin | Updated: October 1, 2015 03:38 IST

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये नऊ वर्षांपूर्वी, ११ जुलै रोजी भीषण बॉम्बस्फोट करून १८९ निरपराधांचा बळी घेतल्याबद्दल

मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये नऊ वर्षांपूर्वी, ११ जुलै रोजी भीषण बॉम्बस्फोट करून १८९ निरपराधांचा बळी घेतल्याबद्दल दोषी ठरलेल्या पाच दहशतवाद्यांना फाशी तर उर्वरित सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी हा निकाल जाहीर केला. याशिवाय न्यायालयाने दोषी ठरलेल्या आरोपींना मिळून एकूण एक कोटी ५७ लाख ८० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या निकालामुळे नऊ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना मृतांच्या नातेवाइकांमध्ये व्यक्त होत होती. या खटल्यातील १३ आरोपींपैकी १२ आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी ११ सप्टेंबर रोजी दोषी ठरवले, तर एकाची सुटका केली होती. त्यानंतर काही दिवस शिक्षेबाबत सुनावणी झाली. अखेर बुधवार निकालाचा दिवस ठरला. सकाळी ११:३० वाजता कडेकोट बंदोबस्तात १२ आरोपींना कोर्ट रूममध्ये हजर करण्यात आले. दुपारी १२ वाजता न्यायाधीश शिंदे यांनी निकाल देण्यास सुरुवात केली. अवघ्या सात मिनिटांत त्यांनी पाच जणांना फाशीची शिक्षा, तर सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचा निकाल जाहीर केला. शिक्षा सुनावल्यानंतरही सर्व दोषी शांतच होते. मात्र त्यांच्या नातेवाइकांनी आणि वकिलांनी हे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि तेथे आरोपी निर्दोष असल्याचे सिद्ध होतील, अशी आशाही दोषींच्या नातेवाइकांनी आणि वकिलांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)---------बॉम्बस्फोटांना भारतीय रंग देण्यात ‘लष्कर’ अपयशीया बॉम्बस्फोटांचा कट प्रत्यक्षात पाकमध्ये शिजला असला तरी हे स्फोट भारतीय दहशतवाद्यांनीच केले, असा बनाव करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींना भारतातच प्रशिक्षण देण्याची ‘लष्कर-ए-तोयबा’ची योजना होती. याची तयारी २००३ पासूनच सुरू झाली होती. परंतु ‘लष्कर’चा हा डाव फसला, असे तपासातून उघड झाले.------कमल अन्सारी (३७), एहतेशाम सिद्दिकी (३०), मोहम्मद फैजल शेख (३६), नावीद हुसेन खान (३०), आसिफ बशीर खान (३८) यांना भारतीय दंडसंहिता ३०२ (हत्या), १२० (ब) (कटकारस्थान) आणि मोक्कातील कलम ३ अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली. मरेपर्यंत त्यांना फाशी ठोठावण्यात यावी, असे न्या. शिंदे यांनी शिक्षा सुनावताना म्हटले.----------मदत करणारे जन्मभर गजाआडमोहम्मद शफी (३२), सोहेल मोहम्मद शेख (४३) , मुजम्मिल शेख (२७), तन्वीर अन्सारी (३७), जमीर अहमद शेख (३६), मोहम्मद अली (४१) आणि साजिद अहमद अन्सारी (३६) यांनी मोक्का, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि आयपीसी कलम १२१ (देशाविरुद्ध युद्ध छेडणे) अंतर्गत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.---------या निर्णयावर मी समाधानी आहे. माझी जबाबदारी मी पार पाडली. सात जणांच्या जन्मठेपेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करायचा की नाही, हे न्यायाधीशांनी केलेल्या कारणीमीमांसेवरूनच ठरवले जाईल. त्यासाठी निकालपत्राची वाट बघावी लागेल. -राजा ठाकरे, विशेष सरकारी वकील