शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार?

By admin | Updated: September 9, 2014 04:42 IST

सहकार चळवळीत मत्स्य व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासात वरदान ठरणारे मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार आहे.

मोहन राऊत, अमरावती- सहकार चळवळीत मत्स्य व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासात वरदान ठरणारे मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार आहे. विदर्भाच्या वाट्याला आलेले हे पद न भरल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.राज्यात मत्स्य विकास महामंडळ १५ वर्षांपूर्वी निर्माण झाले. अनेक वर्षांपासून अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्षपद सहा महिन्यांपूर्वीच जाहीर करून कोकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पुष्पसेन सावंत यांच्याकडे सोपविले आहे. आतापर्यंत विदर्भातील गोड्या पाण्याच्या पट्टय़ाला अध्यक्षपदाचा मान मिळत होता. गेली दहा वर्षे नागपूर येथील बर्वे यांनी हे पद सांभाळले. एक वर्षापासून अध्यक्षपदाचा कार्यभार मत्स्यविकासमंत्री मधुकर चव्हाण सांभाळत आहेत. विदर्भातील भोई समाजातील नेत्यांना अध्यक्षपद द्यावे म्हणून नागपूर, अमरावती, अकोला येथील अनेक नेत्यांनी त्यावेळी प्रयत्न केले. परंतु हे पद भरले नाही.अमरावती विभागात मत्स्य व्यवसाय करणार्‍या ६८, यवतमाळ जिल्ह्यात १७५, अकोल्यात ३८, वाशीम जिल्ह्यात ३४, बुलडाणा जिल्ह्यात ५0 संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. या विभागाला न्याय मिळावा, यासाठी पाचही जिल्ह्यांतील भोई समाज संघटना पुढे सरसावल्या होत्या. अमरावती विभागातील भोई समाजाचे सर्वांगीण प्रश्न सोडविणार्‍या अध्यक्षांची मत्स्यविकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी अपेक्षा या विभागातील ३ लाख भोई समाजाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली होती. परंतु आचारसंहिता घोषित होण्याची वेळ आली असताना विदर्भाला हे पद न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.