पुण्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

By Admin | Updated: June 17, 2014 03:45 IST2014-06-17T03:45:04+5:302014-06-17T03:45:04+5:30

स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ४३वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. या वर्षातील स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातील हा पहिलाच मृत्यू.

The first victim of swine flu in Pune | पुण्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

पुण्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

पुणे : स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ४३वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. या वर्षातील स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातील हा पहिलाच मृत्यू.
प्रतिमा प्रमोद शुक्ला असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वाइन फ्लूची लागण झाल्याने शुक्ला यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवले होते.
३ जूनला त्यांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. ५ जूनला आलेल्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The first victim of swine flu in Pune