शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:43 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद 1992 मध्ये झालेल्या 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात 1994 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली.

मुंबई : राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम नामदेव चौधरी (वय 92) यांचे नुकतेच (ता. 30 ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहआयुक्त सुहास चौधरी यांचे ते वडील होत. देवराम चौधरी मुलाकडेच मुंबई येथे राहत असत.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद 1992 मध्ये झालेल्या 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात 1994 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. चौधरी यांची पहिले राज्य निवडणूक आयुक्तपदी 26 एप्रिल 1994 नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी ते विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झाले होते. आयोगाच्या सुरुवातीच्या काळात मनुष्यबळ, क्षेत्रीय यंत्रणा, कायद्याच्या अनुषंगाने विविध आदेश निर्गमित करणे, मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडणे आदींच्या दृष्टीने त्यांनी अतिशय भक्कम पाया भरणी केली. चौधरी 25 एप्रिल 1999 पर्यंत राज्य निवडणूक आयुक्तपदी कार्यरत होते. 

 चौधरी यांचा जन्म 26 एप्रिल 1930 रोजी जळगाव जिल्ह्यातील भालोद (ता. भालोद) येथे झाला होता.  त्यांनी बी. ए. (इंग्लिश) आणि कायद्याची पदवी संपादन केली होती. शिक्षण घेत असतानाच ते ईलेक्ट्रिक ग्रीड डिपार्टमेंटमध्ये मुख्य लिपिक पदावर नाडियाद आणि सुरत येथे कार्यरत होते. नंतर त्यांनी वकिलीची सनद प्राप्त केली. जळगाव येथून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. ते जळगाव नगरपरिषदेत 10 वर्षे विधी सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. अनेक वेळा विशेष सरकारी वकील म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर ते अकोला येथे सहायक धर्मादाय आयुक्तपदावर रूजू झाले होते.

नंतर त्यांची बदली पुणे आणि मुंबई येथे झाली होती. नंतर त्यांची मंत्रालयात विधी व न्याय विभागात नियुक्ती झाली. कालांतराने विधी व न्याय विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र स्टेट लॉ कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) नियामक मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांची राज्याच पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र