शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

..अन् प्रेताविनाच सरणाला दिला अग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:55 IST

आवंढे गावातील घटना : धर्मांतरामुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील आवंढे येथील फुलाई दाभाडे (६५) या महिलेचा वृद्धापकाळाने बुधवारी रात्री मृत्यू झाला. या महिलेला दोन मुले असून मोठा मुलगा सुभाष हिंदू धर्मात, तर पती महादू दाभाडे आणि लहान मुलगा सुदाम दाभाडे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. मोठ्या मुलाने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आईचा अंत्यविधी करायचे ठरवले, मात्र महिलेचा पती व छोट्या मुलाने ख्रिश्चन धर्मातील रीतीप्रमाणे प्रेताचा दफनविधी करायचे ठरवले. 

 दोघा भावंडांत मोठा वाद झाल्यामुळे गावकऱ्यांनीही दफनविधी करण्यास विरोध केला. शेवटी पोलिसांनी पतीकडे प्रेत सुपुर्द केल्याने ख्रिश्चन धर्माप्रमाणे वसई येथील पाचुबंदर येथे प्रेताचा दफनविधी करण्यात आला. मात्र मोठ्या मुलाने सरण रचून त्यावर बाहुली ठेवून सरणाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. मिळालेल्या माहितीनुसार, आवंढे हे एक आदिवासी लोकवस्ती असलेल्या खेडेगावात महादू दाभाडे यांचे कुटुंब राहते. पत्नी फुलाई (६५), मोठा मुलगा सुभाष व लहान मुलगा सुदाम असे राहतात. महादू, फुलाई व लहान मुलगा सुदाम यांनी खिश्चन धर्म स्वीकारला आहे. बुधवारी रात्री फुलाई हिचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू झाल्याने मोठा मुलगा सुभाष याने हिंदू धर्मातील रिवाजाप्रमाणे आईला अग्नी द्यायचे ठरवले, तर सुदाम याने ख्रिस्ती धर्माप्रमाणे आईचा दफनविधी करण्याचे ठरवले. यावरून दोघामध्ये  वाद सुरु झाले. 

गावकऱ्यांनीही गावात अंत्यसंस्कार करायचे असतील तर हिंदू धर्माप्रमाणेच करावे लागतील अन्यथा गावाच्या हद्दीत दफनविधी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी मृत महिलेच्या पतीशी चर्चा करून पतीच्या इच्छेप्रमाणे दफनविधी करण्याचे ठरले. वसई येथील पाचुबंदर येथे महिलेचा दफनविधी केला . शेवटी मोठ्या मुलाने गावातील स्मशानभूमीत सरण रचून त्यावर बाहुली ठेवून प्रेताविनाच सरणाला अग्नी दिला. या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली असून चर्चेचा विषय बनली आहे.   

टॅग्स :HinduहिंदूDeathमृत्यू