शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील एसी डबल डेकरला अखेर २२ आॅगस्टचा मुहूर्त

By admin | Updated: August 14, 2014 03:37 IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बाप्पा पावला आहे

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बाप्पा पावला आहे. कोकणवासीयांसाठी असलेली एसी डबल डेकर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, २२ आॅगस्टपासून ही ट्रेन प्रीमिअम विशेष म्हणून एलटीटी ते करमाळी अशी धावेल. या ट्रेनच्या २0 फेऱ्या होणार आहेत. मात्र या ट्रेनच्या तिकीट आरक्षणाची तारीख निश्चित करण्यात आली नसून, ती लवकरच करण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. एसी डबल डेकर ट्रेन कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात सुरू होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत ही ट्रेन ‘हॉलीडे स्पेशल’ म्हणून चालवण्यास सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेने २२ आॅगस्टपासून ही ट्रेन विशेष ट्रेन म्हणून एलटीटी ते करमाळी अशी चालवण्याचा निर्णय घेतला. एसी डबल डेकर 0२00५ ट्रेन एलटीटी येथून २२, २४, २६, २८, ३0 आॅगस्ट आणि १, ३, ५,७, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी साडेचार वाजता पोहोचेल. तर 0२00६ ट्रेन करमाळी येथून २३, २५, २७, २९, ३१ आॅगस्ट आणि २, ४, ६, ८ आणि १0 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुटेल, तर त्याच दिवशी करमाळी येथे १७.४0 वाजता पोहोचेल. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मध्य रेल्वेकडून खास भेटच देण्यात आली आहे. ही ट्रेन गणेशोत्सवातच कोकणवासीयांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. (प्रतिनिधी)